२९ बछड्यांचा जन्म आणि २५ जणांना जगवणारी कॉलरवाली भारतीय व्याघ्र संवर्धनाचा आदर्श कशी ठरली?
१९७२ च्या पहिल्या अधिकृत प्रगणनेनुसार भारतात केवळ १८२७ वाघ शिल्लक होते. मात्र, २०२२ च्या अखिल भारतीय व्याघ्र आकलनाचा सविस्तर अहवाल २०२३ मध्ये प्रसिद्ध झाला आणि त्यानुसार भारतातील वाघांची सरासरी अंदाजित संख्या ३६८२ वर पोहोचली आहे. सध्या जगातील सुमारे ७५% वाघ भारतात आढळतात. या पार्श्वभूमीवर व्याघ्र संवर्धनाच्या यशात मोठी भूमिका बजावलेल्या एका ‘सुपर मदर’ वाघिणीबद्दल जाणून घेणे माहितीपूर्ण ठरावे.