२८ वर्षांपूर्वी पाकिस्तान इस्लामिक अणुबॉम्ब तयार करण्यात कसा यशस्वी झाला?
पाकिस्तान आणि इस्रायल यांच्यात गेल्या अनेक दशकांपासून तीव्र द्वेष, धार्मिक-वैचारिक मतभेद आणि एकमेकांबद्दल प्रचंड अविश्वास आहे. अशा दोन कट्टर शत्रू देशांना एकत्र आणून त्यांच्यात मैत्री घडवून आणणं हे अत्यंत कठीण काम आहे. कारण त्यासाठी त्यांना आपला जुना इतिहास विसरून एक नवीन सुरुवात करावी लागेल. म्हणूनच, या दोन्ही देशांमध्ये किती कडू नाते आहे आणि ते एकमेकांना किती मोठा धोका मानतात, हे समजून घ्यायचे असेल, तर १९८० च्या दशकातील ‘कहुटा प्रकरणा’सारखे दुसरे मोठे उदाहरण नाही.