जगाचा नकाशा बदलणार? भारताने UN च्या ‘नकाशा दुरुस्ती’ ठरावाला पाठिंबा का दिला?
आपण पाहत आलेला जगाचा नकाशा असमान आहे का? १६ व्या शतकातील ‘मरकेटर प्रोजेक्शन’ मुळे आफ्रिका, भारत आणि दक्षिण अमेरिका हे खंड प्रत्यक्षात आहेत त्यापेक्षा नकाशावर खूप लहान दिसतात; तर रशिया, कॅनडा आणि ग्रीनलँड हे भाग मोठे दिसतात. या युरोपकेंद्रित आणि वसाहतवादी तफावतीला आव्हान देत संयुक्त राष्ट्र महासभेत ‘नकाशा दुरुस्तीचा’ (Correct The Map) ठराव आणण्यात आला. या ठरावाला भारताने पाठिंबा दिला आहे.