लग्न कधी झालंच नाही, तरी भांगात रक्ताचं कुंकू; सैनिकाची प्रेयसी असणं सोपं असतं का?
प्रेम हे सांगून, ठरवून होत नसतं. कधी पहिल्या भेटीत, पहिल्या नजरेत; तर कधी सहवासात घालवलेल्या काही क्षणांमध्ये बहरत जातं. अनेकदा प्रेम हे मुकं असतं, ते फार गाजावाजा करत नाही. ते मनाच्या एखाद्या कोपर्यात भावबंध जोपासून राहतं. त्या गुलाबी प्रेमाला ज्यावेळी मोठ्या ध्येयाची, त्यागाची जोड मिळते त्यावेळी मात्र ती गाथा होते. अशीच एक गाथा एका बलिदानानंतर २७ वर्षांपूर्वी जन्माला आली आणि आजही तितकीच जिवंत आहे!