सतत थकवा आणि अंगदुखी जाणवतेय? सावध व्हा, या ‘एका’ जीवनसत्त्वाची असू शकते कमतरता!
अनेकदा आपण सततच्या थकव्याला कामाचा ताण समजतो किंवा अंगदुखीकडे जुनाट त्रास म्हणून दुर्लक्ष करतो. पण तुम्हाला माहीत आहे का, की यामागे एका महत्त्वाच्या जीवनसत्त्वाची कमतरता असू शकते? व्हिटॅमिन-डी म्हणजे केवळ हाडांसाठी आवश्यक असणारे पोषक तत्व, असा आपला समज आहे. मात्र, आधुनिक वैद्यकीय संशोधनानुसार व्हिटॅमिन-डीचा आपल्या आरोग्यावर होणारा परिणाम हाडांच्या मजबूती पलीकडे, थेट आपल्या मेंदूपासून ते स्त्रियांच्या संप्रेरकांपर्यंत (Hormones) एवढा व्यापक आहे.