Gauri pujan 2026: गौरीच्या आगमनाआधीच जमिनीतून उमलतात ‘तिचे हात’; काय आहे या रानहळदीचं गूढ?
उन्हाने तापलेल्या, भेगाळलेल्या धरणीवर पावसाच्या सरी कोसळतात. चिंब झालेली धरणी जणू चमत्कार घडवते. निर्जीव भासणाऱ्या मातीतून पाचूचे हिरवे कोंब डोकावू लागतात. पाहता पाहता उजाड माळरानावर गवताचे हिरवेगार गालिचे पसरतात. त्या गालिच्यावर रंगीबेरंगी चिमुकल्या रानफुलांनी जणू नाजूक नक्षी काढलेली असते. या हिरवाईत “गौरीचे हात” म्हणजेच रानहळद ही एक नाजूक वनस्पती अगदी शांतपणे, कोणताही गाजावाजा न करता उमलते; पण आपलं अस्तित्वही ठळकपणे जाणवून देते.