कास पठारावरील ‘निळा गालिचा’ आहे एक कुशल शिकारी! जाणून घ्या या वनस्पती शिकार का करतात?
निसर्गात कोणताही बदल कारणाशिवाय घडत नाही. या वनस्पती प्रामुख्याने डोंगररांगा, दलदलीचे प्रदेश आणि अतिवृष्टीच्या भागात आढळतात. अतिवृष्टीमुळे जमिनीतील नायट्रोजन, फॉस्फरस आणि महत्त्वाची खनिजे वाहून जातात. वनस्पतींना प्रथिनांच्या निर्मितीसाठी नायट्रोजनची नितांत गरज असते. जमिनीतून तो मिळेनासा झाल्यावर या वनस्पतींनी तो कीटकांच्या शरीरातून मिळवण्याची क्षमता विकसित केली. या वनस्पती इतर झाडांप्रमाणे प्रकाशसंश्लेषण (Photosynthesis) करतातच, पण कीटक हे त्यांच्यासाठी ‘मल्टिव्हिटॅमिन’सारखे काम करतात.