पाकिस्तानातील बाळाला दोन लिंग पण मलविसर्जनाचा मार्गच नाही! डिफॅलिया म्हणजे काय?
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर पाकिस्तानमधील एका बाळाच्या जन्माची पोस्ट मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या बाळाचा जन्म दोन लिंगांसह (penile duplication) झाला असून त्याला गुदद्वारही नव्हते. मात्र, ही घटना अलीकडची नसून २०२३ मधील आहे, हे स्पष्ट करणे महत्त्वाचे आहे. वैद्यकीय दृष्टिकोनातून ही अत्यंत दुर्मिळ जन्मजात विकृती असून, सुमारे सहा दशलक्ष बाळांपैकी एका बाळामध्ये अशी अवस्था आढळते. जगभरात आतापर्यंत अशा १००-१२० प्रकरणांचीच नोंद आहे.