सिक्कीमच्या बाबतीत वडिलांची चूक झाली; इंदिरा गांधींच्या ‘त्या’ विधानामागचे सत्य काय?
सोमवारी (२७ एप्रिल) गंगटोक येथे आगमन झाल्यावर पंतप्रधान मोदींनी पायाभूत सुविधा, आरोग्य सेवा, शिक्षण, ऊर्जा आणि कृषी यांसारख्या विविध क्षेत्रांतील अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले. सिक्किम भारतातील एक महत्त्वाचे राज्य असले, तरी अनेकांना सिक्कीम भारताचा भाग कसे झाले हे माहीत नाही. त्याच पार्श्वभूमीवर सिक्कीमच्या बाबतीत इंदिरा गांधींची भूमिका काय होती? आणि त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांची भूमिका चुकीची का मानली? याचा घेतलेला हा आढावा.