एकापेक्षा जास्त लोकांवर मनापासून प्रेम करणे शक्य आहे? काय आहे ‘पॉलिअॅमरी’?
दोन व्यक्ती, एक गोड प्रेमकहाणी, प्रेमात घेतलेल्या आणाभाका आणि 'हॅपी एंडिंग'… लहानपणापासून आपण रुपेरी पडद्यावर आणि पुस्तकात प्रेमाची हीच परफेक्ट चौकट पाहत आलोय. पण, एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात एकाच वेळी दोन किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती असतील तर… आणि त्या दोघांवरही त्या व्यक्तीचं तितकंच मनापासून प्रेम असेल, त्यांच्यात भावनिक आणि शारीरिक नातंही असेल….तर, या नात्याला थेट 'धोका' किंवा 'फसवणूक' म्हणायचं का?