हॉर्मुझची नाकेबंदी झुगारून रशियन अब्जाधीशाची सुपरयॉट बाहेर कशी पडली?
Ship-tracking प्लॅटफॉर्म्सने दिलेल्या माहितीनुसार, अलेक्सी मोर्डाशोव्ह यांची ‘नॉर्ड’ (Nord) ही सुपरयॉट सध्या नाकेबंदी असलेल्या हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून मार्गक्रमण करताना दिसून आली आहे. मोर्डाशोव्ह यांच्यावर अमेरिका, ब्रिटन आणि युरोपियन युनियनसह पाश्चात्य देशांनी निर्बंध लादलेले आहेत. २८ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने हल्ले सुरू केल्यानंतर इराणने हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्याची घोषणा केली होती. असे असतानाही नाकेबंदी झुगारून ही सुपरयॉट इथून सहिसलामत बाहेर कशी पडली, याचीच चर्चा सध्या जगभरात रंगली आहे.