सम्राट अशोक बौद्ध, पण त्याची पत्नी जैन अन् नातूही जैन धर्माचा मोठा समर्थक, असे का?
३१ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महावीर जयंतीच्या निमित्ताने गांधीनगरमधील कोबा येथे सम्राट संप्रती संग्रहालयाचे उद्घाटन केले. हे संग्रहालय अशोकाचा नातू संप्रती याच्या कार्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ तयार करण्यात आले आहे. मौर्य सम्राट अशोकाने बौद्ध धर्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी आपले मोलाचे योगदान दिले. तर, त्याचा नातू म्हणजेच सम्राट संप्रती हा जैन धर्माच्या राजश्रयासाठी ओळखला जातो.