अयोध्येतील रामजन्मभूमी परिसरात कोरियन राणीचा पुतळा कशासाठी? इतिहास काय?
रामजन्मभूमी अयोध्येत कोरियाच्या इतिहासातील एक प्रसिद्ध राणी हेओ ह्वांग- ओक यांच्या मूर्तीचे अनावरण करण्यात आले. कोरियातील ही प्रसिद्ध राणी आजही कोरियातील लाखो लोकांच्या मनावर राज्य करते. परंतु हिचा संबंध फक्त कोरियाशी नाही तर पौराणिक कथांच्या माध्यमातून भारताशीही जोडला जातो. तिचे जन्मस्थान अयोध्या आहे, असे मानले जाते. प्रचलित लोककथांनुसार इ.स. ४८ मध्ये म्हणजेच इसवी सनाच्या पहिल्या शतकात अवघ्या वयाच्या १६ व्या वर्षी तिने समुद्रमार्गे कोरियाच्या दिशेने प्रवास केला.