भारताच्या शेजारील ‘या’ देशात एकही मशीद नाही? जपानमधील वादानंतर या देशाची चर्चा का?
अलीकडेच जपानमधील कावागोए शहरातून एक बातमी समोर आली. तिथे पाकिस्तानी नागरिकांनी उभारलेल्या एका मशिदीचे उद्घाटन पाकिस्तानचे जपानमधील राजदूत अब्दुल हमीद यांच्या हस्ते करण्यात आले. परंतु, ही मशीद बेकायदेशीररित्या बांधल्याचा आरोप झाल्याने सध्या ती वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. वासेदा विद्यापीठातील प्राध्यापक हिरोफुमी तानादा यांनी संगितले की, २०२५-२०२६ पर्यंत जपानमध्ये मशिदींची संख्या १६० वर पोहोचली आहे. जपानमधील स्थानिक नागरिक मशिदींच्या या वाढत्या संख्येला आणि नमाजच्या आवाजाला (अझान) विरोध करत आहेत.