तरुणांनंतर आता कुत्र्यांमध्येही कॅन्सरचे प्रमाण का वाढतेय? धक्कादायक वास्तव आहे तरी काय?
आजच्या शहरी घरात कुत्र्याची केवळ पाळीव प्राणी अशीच ओळख नसते, तर तो कुटुंबाचा एक अविभाज्य सदस्य असतो. त्यामुळे जेव्हा एखाद्या पाळीव कुत्र्याला कॅन्सर असल्याचं निदान होतं, तेव्हा तो धक्का…, केवळ व्हेटरनरी क्लिनिकपुरता मर्यादित राहत नाही; तर तो संपूर्ण घराला हादरवून सोडतो. अशा घटनांची संख्या सध्या वाढताना दिसत असल्यामुळे एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे; कुत्र्यांमध्ये कॅन्सर खरोखर वाढतोय का, की तो आज अशी प्रकरणे अधिक प्रमाणात समोर येत आहेत?