चीनने का मारल्या लाखो चिमण्या; …म्हणूनच आला का महाचिनी दुष्काळ?
१९५८ साली आकाशातून चिमण्या खाली पडत होत्या… हे जगात इतरत्र कुठेही घडत नव्हते. हे फक्त चीनमध्ये घडत होते. या चिमण्या काही कोणत्याही नैसर्गिक कारणामुळे मरत नव्हत्या. तर, चिनी लोक गोफण किंवा बंदुकीच्या गोळ्यांनी या चिमण्यांना मारत होते. ज्यांना चिमण्यांना मारायचे नव्हते, ते भांडी-कुंडी वाजवून आलेल्या चिमण्यांना उडवत होते, त्यामुळे त्या चिमण्यांना कुठेही थारा मिळत नव्हता. अनेक चिमण्या थकाव्यामुळे मरत होत्या. हे भयानक दृश्य ‘चार कीड मोहिमे’चा (Four Pests Campaign) भाग होते.