वाईट स्वप्न का पडतात? त्यावेळी मेंदूत नेमकं काय घडत असतं?
काही स्वप्ने सुखद असतात, काही विचित्र, काही अगदी विस्कळीत, तर काही इतकी भीतीदायक असतात की, आपण दचकून जागे होतो. छातीत धडधड, अंगाला घाम, मनात भीती आणि काही क्षण वास्तव व स्वप्न यांच्यात फरकच कळेनासा होतो. प्राचीन काळात स्वप्ने ही देवाचा संदेश, भविष्यातील संकेत किंवा अदृश्य शक्तींचे दूत मानली जात होती. मात्र, न्यूरोसायन्सने स्वप्नांमागील विज्ञानाचा अनेक अंगानी शोध घेतला आहे.