भारताचं स्वातंत्र्य अन् जपानची शरणागती; १५ ऑगस्ट या तारखेचा नेमका संबंध काय?
भारत दरवर्षी १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिन साजरा करतो; तर पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन १४ ऑगस्टला असतो. ब्रिटिश भारताची फाळणी होऊन भारत आणि पाकिस्तान हे दोन देश निर्माण झाले. भारतीय स्वातंत्र्य कायदा, १९४७ (Indian Independence Act, 1947) अंतर्गत या दोन्ही देशांना स्वातंत्र्य मिळाले होते. या ॲक्टमध्ये 'appointed day' म्हणजे सत्तांतराचा अधिकृत दिवस १५ ऑगस्ट १९४७ असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले होते.