पुरुष सावळा तरी, बायको गोरीच हवी?; विवाहविषयक संकेतस्थळांवरील संशोधनातून काय समोर आले?
आजही भारतीय समाजात लग्नासाठी मुलगी पाहताना तिचे शिक्षण, नोकरी, कौटुंबिक पार्श्वभूमी आणि स्वभाव यांच्याबरोबरच त्वचेच्या रंगालाही महत्त्व दिले जाते. अनेक विवाहविषयक जाहिरातींमध्ये आजही 'गोरी', 'उजळ वर्णाची' किंवा 'फेअर कॉम्प्लेक्शन' अशा शब्दांचा वापर केलेला आढळतो. नातेवाईकांच्या गोतावळ्यात एखाद्या मुलीच्या रंगावरून सहजच बोचरी टीका केली जाते.