पितृपक्ष १५ दिवसांचा की १६? यामागचं नेमकं गणित आणि रहस्य काय?
यंदा १० ऑक्टोबर रोजी सर्वपित्री अमावस्या आहे. म्हणजेच या दिवशी या वर्षीच्या पितृपक्षाची सांगता होत आहे. यानंतर हिंदू धर्मातील शरद ऋतूतील सणांची सुरुवात होते. त्याच पार्श्वभूमीवर पितृपक्ष म्हणजे नक्की काय आणि तो याच काळात का पाळला जातो? हे पाळण्यामागील श्रद्धा कोणत्या आहेत? हे जाणून घेण्याचा हा प्रयत्न.