झोपेत असताना मृत्यू का होतो? यामागची ‘ही’ ५ धोक्याची लक्षणं कशी ओळखाल?
रात्री झोपताना आपण उद्याची स्वप्नं पाहत असतो. घरातले सगळे शांत झोपलेले असतात आणि सकाळी सगळे पुन्हा उठतील, हीच अपेक्षा असते. पण काही वेळा ही झोपच एखाद्यासाठी शेवटची ठरते. बाहेरून पाहता झोपेत मृत्यू येणं शांत किंवा वेदनामुक्त वाटतं; मात्र वैद्यकीयदृष्टीने पाहिलं तर असा मृत्यू अनेकदा गंभीर, निदान न झालेल्या किंवा दुर्लक्षित आरोग्यविषयक समस्यांचा इशारा असतो. म्हणूनच 'झोपेत मृत्यू' हा विषय वेदना नसलेला वाटत असला तरी तो समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे.