१५०० प्रवाशांच्या मृत्यूनंतरही टायटॅनिकमध्ये एकही सांगाडा का सापडला नाही?
हिमखंडाला धडक दिल्यानंतर १५ एप्रिल १९१२ रोजी आरएमएस टायटॅनिक या जहाजाला उत्तर अटलांटिक महासागरात जलसमाधि मिळाली आणि त्यात १५०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. मात्र, १९८५ साली संशोधक रॉबर्ट बॅलार्ड यांनी सुमारे ३८०० मीटर खोल समुद्रात या जहाजाचे अवशेष शोधून काढले, तेव्हा त्यांना सांगाड्यांऐवजी फक्त बूट, कपडे आणि वैयक्तिक वस्तूच आढळल्या असे का, याचा घेतलेला शोध.