कॅन्सरवर मात केल्यानंतर केस पूर्वीसारखेच दिसतात का? काय आहे ‘Chemo Curls’?
कॅन्सरवरील उपचार हा रुग्णासाठी केवळ आजाराशी लढण्याचा नाही, तर स्वतःच्या शरीरातील आणि मनातील बदल स्वीकारण्याचाही प्रवास असतो. या काळात होणारे बदल अनेक असतात, मात्र त्यातील सर्वात ठळक आणि लगेच जाणवणारा बदल म्हणजे केस गळणे. हा अनुभव अनेक रुग्णांसाठी केवळ शारीरिक नसून, तो मानसिकदृष्ट्याही आव्हानात्मक ठरतो.