डोकलाम-गलवानचे कमांडर झाओ झोंगकी यांना चीनने का हटवले? ‘पीएलए’मध्ये नेमके काय सुरू आहे?
डोकलाम (२०१७) आणि गलवान (२०२०) या भारत-चीन संघर्षांच्या काळात ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’च्या (पीएलए) पश्चिम थिएटर कमांडचे नेतृत्व करणारे जनरल झाओ झोंगकी यांना चीनच्या सर्वोच्च राजकीय सल्लागार मंडळातून हटविण्यात आले आहे. मागील काही वर्षांत १००हून अधिक कमांडर आणि लेफ्टनंट जनरल यांना पदावरून हटविण्यात आले किंवा ते सार्वजनिक जीवनातून गायब झाले. त्यामुळे ही केवळ भ्रष्टाचारविरोधी मोहीम नसून पीएलएच्या नेतृत्वाची व्यापक फेररचना असल्याचे संकेत मिळतात.