ऐन ‘व्हॅलेंटाईन डे’ च्या दिवशी सोने चांदी महागले! सोन्याचा आकडा ८६ हजारांच्या पार!
जर तुम्ही तुमच्या जोडीदाराला सोन्या चांदीचे दागिने गिफ्ट करायचा विचार करत असाल तर आज आजचा सोने चांदीचा दर जाणून घ्या.
जर तुम्ही तुमच्या जोडीदाराला सोन्या चांदीचे दागिने गिफ्ट करायचा विचार करत असाल तर आज आजचा सोने चांदीचा दर जाणून घ्या.
स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामराने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे ज्यात तो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर विडंबन करणारं गाणं म्हणताना दिसतो. या गाण्यात शिंदेंचा उल्लेख गद्दार असा केला आहे. खासदार संजय राऊत यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. कामराने शिंदेंचं नाव घेतलं नसूनही, गाण्यातील वर्णनामुळे तो शिंदेंबाबतच बोलतोय हे स्पष्ट आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी रायगड किल्ल्यावर असलेल्या वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. त्यांनी सांगितले की, या समाधीचा कोणताही ऐतिहासिक पुरावा नाही. भारतीय पुरातत्व विभागानेही याबाबत कोणतीही माहिती नसल्याचे स्पष्ट केले आहे. शिवप्रेमींच्या मागणीनुसार, ३१ मे २०२५ पर्यंत ही कपोलकल्पित समाधी हटवावी, असे संभाजीराजे म्हणाले.
रश्मिका मंदाना सध्या ‘सिकंदर’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. ए.आर.मुरुगदॉस दिग्दर्शित ‘सिकंदर’ चित्रपटात रश्मिका सलमान खानसह प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहे. ३० मार्चला सलमान व रश्मिकाचा हा बहुचर्चित व बहुप्रतीक्षित चित्रपट प्रदर्शित होणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा पार पडला. या ट्रेलर लॉन्च सोहळ्यातील रश्मिका मंदानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
24 March Panchang and Rashibhavishya: आज फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील दशमी तिथी आहे. दशमी तिथी मंगळवारी सकाळी ५ वाजून ६ मिनिटांनी संपेल. आज दुपारी ४ वाजून ४५ मिनिटांपर्यंत परिघ योग राहील. तर उत्तराषाढा नक्षत्र संपूर्ण दिवस असेल आणि मंगळवारी पहाटे ४ वाजून २७ मिनिटांपर्यंत राहील. तसंच आज राहू काळ ७ वाजून ३० मिनिटांनी सुरु होईल ते ९ वाजेपर्यंत असणार आहे. त्याचप्रमाणे आज उत्तराषाढा नक्षत्रात मेष ते मीनचा दिवस कसा जाईल हे आपण जाणून घेऊयात…
‘झी नाट्य गौरव २०२५’मध्ये ‘ज्याची त्याची लव्हस्टोरी’ या नाटकासाठी सुयश टिळकला सर्वोत्कृष्ट अभिनेता या पुरस्कारने गौरविण्यात आलं. १७ वर्षांनी सुयशला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. या पुरस्कार सोहळ्यानिमित्ताने सुयशने ‘ज्याची त्याची लव्हस्टोरी’ या नाटकादरम्यानचा एका चाहतीचा हृदयस्पर्शी किस्सा सांगितला. याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतं आहे.
‘लक्ष्मी निवास’ मालिकेतील कलाकार सोशल मीडियावर खूप चर्चेत असतात. या मालिकेतील कलाकार मंडळी ट्रेंडिंग गाण्यावर नेहमी रील व्हिडीओ करत असतात. नुकतंच या मालिकेतील कलाकारांनी शांता आजीबरोबर रील व्हिडीओ केला आहे; ज्याची सध्या चर्चा सुरू आहे. 'लक्ष्मी निवास’ मालिकेतील मंगला म्हणजे अभिनेत्री स्वाती देवलने नवा रील व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये मालिकेतील कलाकार ‘झापुक झुपूक’ गाण्यावर जबरदस्त डान्स करताना पाहायला मिळत आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरचिटणीस दत्तात्रेय होसाबळे यांनी कर्नाटक सरकारच्या मुस्लिमांना चार टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयाला विरोध केला आहे. त्यांनी संविधान धर्मआधारित आरक्षणाला परवानगी देत नाही, असे सांगितले. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेच्या हे विरुद्ध असल्याचेही त्यांनी नमूद केले. पूर्वीच्या आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रातील अशा प्रयत्नांना न्यायालयांनी नाकारले होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
Travelling in Flight while having cold: विमान प्रवास करताना अनेकांना कान दुखण्याचा अनुभव येतो. परंतु सर्दी किंवा संबंधित ऍलर्जी असलेल्यांसाठी हा अनुभव अत्यंत वेदनादायक आणि तीव्र होऊ शकते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी महाराष्ट्रातील लोकप्रिय नृत्यांगना गौतमी पाटीलचे कौतुक केले आहे. त्यांनी विधानसभेत गौतमीची बाजू घेतली होती. आव्हाड म्हणाले की, गौतमीने प्रस्थापित वर्गाच्या नाचगाण्यावर धक्का दिला आहे. तिच्या अदाकारीमुळे ती अनेकांना आवडते. त्यांनी गौतमीला सामाजिक न्यायासाठी महत्त्वपूर्ण मानले आणि तिच्या यशाचे स्वागत केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी औरंगजेब प्रकरणावर भाष्य करताना, औरंगजेबाच्या कबरीची मागणी आणि वक्फबाबतच्या चर्चेवर मतं मांडली. त्यांनी सरकारच्या कामाचे समर्थन केले आणि हिंदू समाजाने एकत्र राहण्याचे आवाहन केले. होसबळे यांनी बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारांचा निषेध केला. कर्नाटकमध्ये जन्मलेले होसबळे, अभाविपमधून राजकारणात आले आणि संघात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.
Success Story of Anubhav Dubey: जर तुमच्या शहरात चाय सुट्टा बारचे आउटलेट असेल, तर कदाचित तुम्हीही तुमच्या मित्रांसोबत तिथे चहाचा आस्वाद घेतला असेल. २०१६ पूर्वी कोणीही विचार केला नव्हता की चहा विकण्याचा व्यवसाय इतका यशस्वी होऊ शकतो. आयआयटी, आयआयएम किंवा यूपीएससी सारख्या परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरच यश मिळते असे लोक मानतात, परंतु अनुभव दुबेची कहाणी या विचारसरणीला मात देते. चाय सुट्टा बारचे सह-संस्थापक अनुभव दुबे यांचा प्रवास धैर्य, कठोर परिश्रम आणि उद्योजकतेचे उदाहरण आहे.
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांनी तयारी सुरू केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही पक्षबांधणीला महत्त्व दिलं असून, राज ठाकरेंनी बैठका घेतल्या आहेत. मनसेत फेरबदल करून संदीप देशपांडे यांना मुंबई शहराध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे. देशपांडे यांनी निवडणुकीत चांगला परफॉर्मन्स देण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. यशवंत किल्लेदार, कुणाल माईनकर, आणि योगेश सावंत यांनाही विविध विभागांच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.
संजय राऊत यांनी औरंगजेबाच्या कबरीवरून सुरू असलेल्या वादात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सैफ अली खानवर टीका केली आहे. राऊत म्हणाले की, औरंगजेबाची कबर मराठ्यांच्या शौर्याचं प्रतीक आहे, तर तैमुरच्या नावाने मुलाचं नाव ठेवणाऱ्या सैफ अली खानचं मोदींनी कौतुक केलं. तसेच, लालकृष्ण आडवाणींची अवस्था शाहजहांसारखी एकांतवासात ठेवली असल्याचंही त्यांनी म्हटलं.
अमेरिकेतील व्हर्जिनियामध्ये २० मार्चला एका स्टोअरमध्ये गोळीबारात ५६ वर्षीय प्रदीप कुमार पटेल आणि त्यांच्या मुलीची हत्या करण्यात आली. आरोपी जॉर्ज फ्राझियरला अटक करण्यात आली आहे. गोळीबारात एक महिला जखमी झाली आहे. प्रदीप कुमार मूळचे मेहसाणचे होते. त्यांच्या मृत्यूने पटेल कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गुजराती समाजाने शोक व्यक्त केला आहे.
दिशा सालियन मृत्यूप्रकरणाची फाईल पुन्हा उघडण्यात येणार आहे. नारायण राणे यांनी आदित्य ठाकरेंवर आरोप केले होते, ज्यावर उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना फोन केल्याचा दावा केला होता. संजय राऊतांनी या आरोपांचे खंडन केले असून उद्धव ठाकरे आणि मिलिंद नार्वेकरांनी कोणताही फोन केला नसल्याचे स्पष्ट केले. राऊतांनी नारायण राणेंच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली आणि राजकीय वातावरण खराब झाल्याची टीका केली.
मेरठ येथील मर्चंट नेव्ही अधिकारी सौरभ राजपूतच्या हत्येप्रकरणी त्याची पत्नी मुस्कान रस्तोगी आणि तिचा प्रियकर साहिल शुक्ला यांना अटक करण्यात आली आहे. दोघेही गंभीर अंमली पदार्थांच्या व्यसनात असून तुरुंगातही ड्रग्सची मागणी करत आहेत. मुस्कानने साहिलसोबत मिळून सौरभची हत्या केली आणि त्याचे शरीर तुकडे करून ड्रममध्ये लपवले. अटकेनंतर, दोघांना तुरुंगात ठेवण्यात आले असून त्यांच्यावर व्यसनमुक्ती उपचार सुरू आहेत.
अभिनेता सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणात सीबीआयने सादर केलेल्या अंतिम अहवालात रिया चक्रवर्तीला क्लिन चिट देण्यात आली आहे. सुशांतचा मृत्यू आत्महत्येमुळेच झाल्याचं नमूद आहे. रियाचे वकील सतीश मानेशिंदे यांनी या निर्णयाचं स्वागत केलं असून, रिया निर्दोष असल्याचं सांगितलं. रियाला या प्रकरणात खूप त्रास सहन करावा लागला, पण ती वाघिणीसारखी लढली, असंही त्यांनी म्हटलं.
अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यू प्रकरणात सीबीआयने क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे. या अहवालानुसार, सुशांतचा मृत्यू आत्महत्या आहे आणि त्यात कोणताही गुन्हेगारी अँगल नाही. रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबाला क्लीन चिट देण्यात आली आहे. सुशांतचा मृतदेह १४ जून २०२० रोजी आढळला होता. सुरुवातीला मुंबई पोलिसांनी तपास केला, नंतर सर्वोच्च न्यायालयाने १९ ऑगस्ट २०२० रोजी सीबीआयला तपासाचे अधिकार दिले.
How To Digest Food After Dinner: रात्रीच्या जेवणानंतर योग्य रुटिन फॉलो केल्याने पचनक्रिया मोठ्या प्रमाणात सुधारते, ब्लोटिंग टाळता येते आणि चयापचयदेखील वाढवता येतो. या सोप्या पण फायदेशीर सवयी पोटाचे आरोग्य राखतात आणि शरीराला अन्न कार्यक्षमतेने पचवण्यास सक्षम करतात, जेणेकरून एकूणच तंदुरुस्ती सुनिश्चित होईल.
नागपूरमध्ये दंगल भडकविणाऱ्या आरोपींकडून नुकसान वसूल करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्याच वेळी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश उज्जल भुयान यांनी विविध राज्यांतील आरोपींच्या घरांवर होणाऱ्या बुलडोझर कारवाईवर टीका केली. त्यांनी ही कारवाई संविधानाच्या विरोधात असल्याचे सांगितले.
ज्येष्ठ अभिनेते राकेश पांडे यांचे २१ मार्च २०२५ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. त्यांच्या मुलीने ही बातमी दिली. राकेश पांडे यांनी १९६९ मध्ये 'सारा आकाश' चित्रपटातून अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी हिंदी आणि भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केले. 'छोटी बहू' आणि 'दहलीज' मालिकांमध्येही त्यांनी भूमिका साकारल्या. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिशा सालियन मृत्यू प्रकरणात माजी मंत्री आदित्य ठाकरे यांचं नाव जोडलं आहे. राणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, उद्धव ठाकरे यांनी त्यांना दोनदा फोन करून आदित्यचं नाव न घेण्याची विनंती केली होती. राणे यांनी स्पष्ट केलं की, त्यांनी कोणाचं नाव घेतलं नाही, पण निरपराध मुलीच्या हत्येप्रकरणी तडजोड होणार नाही.
नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे तांत्रिक अडचणींमुळे २७८ दिवस आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात अडकले होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पत्रकार परिषदेत त्यांच्या भत्त्याबाबत विचारले असता, त्यांनी मजेशीर उत्तर दिले. नासाच्या धोरणानुसार, अंतराळवीरांना अतिरिक्त वेळेसाठी फक्त ५ डॉलर्स दैनंदिन भत्ता मिळतो.
'बिग बॉस 13' फेम माहिरा शर्मा आणि क्रिकेटर मोहम्मद सिराज यांच्या डेटिंगच्या अफवा मागील काही महिन्यांपासून सुरू होत्या. मात्र, माहिरा आणि सिराज दोघांनीही या अफवांना पूर्णपणे फेटाळून लावले आहे. माहिराने इन्स्टाग्रामवर पोस्ट करून स्पष्ट केलं की ती कोणालाही डेट करत नाहीये. सिराजनेही त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर या बातम्या निराधार असल्याचं सांगितलं. दोघांनीही पापाराझींना अफवा पसरवणं थांबवण्याचं आवाहन केलं आहे.
'स्टार प्रवाह'वरील 'प्रेमाची गोष्ट' मालिका ४ सप्टेंबर २०२३पासून सुरू झाली. या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांची मनं जिंकली. आज 'प्रेमाची गोष्ट' मालिकेने ५०० भागांचा यशस्वीरित्या टप्पा गाठला. यानिमित्ताने मालिकेच्या सेटवर सेलिब्रेशन करण्यात आलं. यासाठी खास लाल फुग्यांचं, फुलांचं डेकोरेशन करण्यात केलं होतं. मुक्ता, सागर, सावनी, सई, मिहिर, कोमल असे सर्वजण या सेलिब्रेशनमध्ये पाहायला मिळाले.
बॉलीवूड अभिनेत्री सुचित्रा पिल्लईने खुलासा केला की तिचा पती लार्स केएल्डसनने एकेकाळी प्रीती झिंटाला डेट केलं होतं. मात्र, त्यांच्या ब्रेकअपचं कारण ती नव्हती. सुचित्राला 'बॉयफ्रेंड पळवणारी' म्हटलं गेलं होतं, पण ती आणि प्रीती मैत्रिणी नव्हत्या. सुचित्राने २००५ मध्ये लार्सशी लग्न केलं आणि त्यांना एक मुलगी आहे. प्रीतीने फायनान्स अॅनालिस्ट जीन गुडइनफशी लग्न केलं असून त्यांना जुळी मुलं आहेत.
Chinese phishing scam: चिनी फिशर्स अमेरिकेतील रहिवाशांची टेक्स्ट मेसेजद्वारे अमेरिकन टोल रोड ऑपरेटरच्या नावाने फसवणूक करत आहेत. हे मेसेज बनावट टोल बिलांसह संपूर्ण अमेरिकेतील आयफोन आणि अँड्रॉइड वापरकर्त्यांना लक्ष्य करीत असल्याचे म्हटले जाते. FBI ने वापरकर्त्यांना हे मेसेज त्वरित डिलीट करण्याचा सल्ला दिला आहे.
सोमवारी नागपुरात दोन गटांत झालेल्या हिंसाचारात जखमी झालेल्या युवकाचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस आयुक्तांबरोबर बैठक घेऊन 92 लोकांना अटक केली. सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्यांवरही कारवाई होणार आहे. दंगेखोरांची प्रॉपर्टी विकून नुकसान भरपाई वसूल केली जाईल. दंगा करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशाराही त्यांनी दिला.
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाची चर्चा सुरू झाली आहे. अभिनेत्री अर्चना नेवरेकरने संगमेश्वर कसबा येथील महाराजांना कैद ठेवलेल्या वाड्याला भेट दिली. तिने सोशल मीडियावर फोटो शेअर करत आपल्या मुलाला इतिहास आणि संस्कृती समजवण्याचे महत्त्व सांगितले. तिच्या पोस्टमध्ये ती म्हणते, "प्रत्येक आई जिजाबाई होऊ शकत नाही, पण चांगला माणूस घडवण्यासाठी मनाची तयारी लागते."
नागपूर येथील पत्रकार प्रशांत कोरटकर यांच्यावर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप आहे. कोल्हापूर सत्र न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर कोरटकर दुबईत पळून गेल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी कोरटकरला शोधून आणण्याचे आव्हान सरकारसमोर असल्याचे म्हटले आहे.