सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; जाणून घ्या आजचा २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा दर
Today’s Gold Silver Price : सोन्या-चांदीचे दर दिवसेंदिवस नवा उच्चांक गाठत आहे, लवकरच सोन्याचा दर ८७ हजारांच्या पार जाण्याची चिन्ह दिसत आहेत. यात गुरुवारी देखील सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. २४ कॅरेट सोन्याची किंमत ही भारतात सध्या ८६,००० रुपये प्रति १० ग्रॅम झाली आहे. आज सकाळी ९.३० वाजेपर्यंत सोन्याच्या किंमतीमध्ये ३६० रुपयांची वाढ झाली आहे. तर चांदीच्या दरात २४० रुपयांची वाढ झाली आहे. देशात आजच्या घडीला चांदीचा दर ९६,०५० रुपये आहे. पण आज तुमच्या शहरात सोन्या-चांदीचे दर नेमके काय आहेत जाणून घेऊ…