७५ वर्ष वाट न अडवता, डीजेमुक्त वातावरणात साजरा होतो डोंबिवलीत टिळकनगरचा गणेशोत्सव
डोंबिवली - दणदणाट मुक्त गणेशोत्सव साजरा करा, असे पुणे, ठाणे आणि राज्याच्या विविध भागात सामाजिक वातावरण निर्माण होत असताना, मागील ७५ वर्षापासून सार्वजनिक रस्त्याची वाट न अडवता, दणदणात न करता, पारंपारिक पध्दतीने डोंबिवलीतील टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा गणेशोत्सव उत्साहाने शांततेत साजरा केला जातो. पर्यावरणस्नेही, पारंपारिक पध्दती आणि सामाजिक उपक्रम, सामाजिक भान ठेऊन उत्सव साजरा करण्यावर टिळकनगर गणेशोत्सव मंडळाचा सर्वाधिक भर असतो.