उत्सवाच्या नावाखाली इतरांना त्रास नको! एकनाथ शिंदेंचा गणेश मंडळांना थेट सल्ला
ठाणे - उत्सव साजरा करताना इतरांना त्रास किंवा गैरसोय होणार नाही, याची काळजी घेऊन संस्कृती, परंपरा आणि सामाजिक सलोखा जपावा, असा सल्ला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणेशोत्सव मंडळाना दिला. गणेशोत्सव केवळ देखावे, आरास आणि रोषणाईपुरता मर्यादित न राहता त्यातून समाजप्रबोधन, जनजागृती आणि सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे, असे त्यांनी मंडळाना सांगितले.