आधी २, नंतर १० हात; मोदक आणि उंदीर कधी आले? गेल्या १५०० वर्षांत कशी बदलली गणपतीची मूर्ती?
गणपती बाप्पाची मूर्ती म्हटली की डोळ्यांसमोर चार हात, लंबोदर, हातात मोदक आणि पायाशी मूषक असलेली प्रतिमा उभी राहते. मात्र प्राचीन काळात गणपतीची मूर्ती अशी नव्हती! गेल्या १५०० वर्षांत दोन हातांच्या गणापासून ते चार, आठ आणि दहा हातांच्या स्वतंत्र देवतेपर्यंत गणेशमूर्तीमध्ये कसे बदल होत गेले? मोदक आणि मूषक मूर्तीशास्त्राचा भाग नेमके केव्हा झाले? ब्रिटिश म्युझियमच्या अभ्यासासह जाणून घ्या गणरायाचा ऐतिहासिक प्रवास.