कल्याणमध्ये डीजेमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याच्या मागणीला जोर
कल्याण : राज्याच्या विविध भागांत ध्वनिप्रदूषणमुक्त व डीजे मुक्त गणेशोत्सव साजरा करण्याच्या मागणीने जोर धरला आहे. आता कल्याणमध्ये काही सामाजिक संस्था, जागरूक नागरिकांनी कल्याण शहर परिसरातही डीजेमुक्त, ध्वनिप्रदूषणमुक्त गणेशोत्सव साजरा व्हावा, यासाठी मोहीम सुरू केली आहे.