टिळकांच्या आधी ‘या’ संतांनी रोवली सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ !
सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक कोण किंवा महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात नेमकी कोणी केली, हा प्रश्न उपस्थित झाला की अनेकदा वेगवेगळ्या ऐतिहासिक दाव्यांवरून चर्चा रंगताना दिसते. मात्र, या विषयावर आता एका नव्या ऐतिहासिक पुराव्यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. प्रसिद्ध इतिहास अभ्यासक आणि लेखक कौस्तुभ कस्तुरे यांनी नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या एका सविस्तर माहितीनुसार, सार्वजनिक गणेशोत्सवाची पहिली नांदी आणि पुढाकार संत रामदास स्वामी यांनी घेतल्याचे समोर आले आहे.