एनर्जी ड्रिंक्समुळे तरुणांच्या रक्तातील साखरेत होते वाढ अन् बळवतायत ‘हे’ गंभीर आजार
Energy Drink Side Effects : सध्या परीक्षेचा काळ सुरू आहे, त्यामुळे बरेच विद्यार्थी लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि एकाग्रता वाढवण्यासाठी एनर्जी ड्रिंकचा वापर करतात. जिममध्ये जाणारे तरुण तर सर्रासपणे एनर्जी ड्रिंकचे कॅन पिताना दिसतात. परंतु, सतत एनर्जी ड्रिंक पिण्याच्या सवयीने शरीरात कॅलरीजचे प्रमाण वाढते आणि ही सवय नंतर व्यसनात बदलते. अशाने तरुणांच्या शरीरावर प्रतिकूल परिणाम होतो.