महिलांनो, फेअरनेस क्रीम वापरताय? मग सावधान, किडनीवर होऊ शकतो गंभीर परिणाम
Fairness Creams Kidney Problems : बरेच जण त्वचेचा रंग उजळवण्यासाठी किंवा त्वचेचा पोत सुधारण्यासाठी फेअरनेस क्रीम्स किंवा इंजेक्शनचा वापर करतात. पण, अशा क्रीम्स आणि इंजेक्शनमुळे तुमच्या शरीरावर हानिकारक परिणाम होत असतात याकडे मात्र लोक दुर्लक्ष करतात. उजळ दिसण्यासाठी वर्षानुवर्षे ते अशा प्रकारच्या क्रीम्स, इंजेक्शनचा वापर करीत राहतात.