एमएस धोनीप्रमाणे मांसाहारी व्यक्तीने शाकाहारी असा बदल केल्यास शरीरावर काय परिणाम होतो?
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी क्रिकेट कारकिर्दीबरोबरच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेदेखील तितकाच चर्चेत असतो. चाहत्यांना त्याची दैनंदिन दिनक्रिया जाणून घेण्यात फार उत्सुकता असते. निवृत्तीनंतर तो सध्या काय करतो, काय खातो, कुठे फिरतो या सर्व गोष्टी चाहत्यांना जाणून घ्यायच्या असतात. यात तुमच्यापैकी अनेकांना माहीत असेल की, धोनीला मांसाहारी पदार्थ खायला आवडतात. पण माजी भारतीय क्रिकेटपटू आणि सध्याचे क्रिकेट समालोचक आकाश चोप्रा यांनी धोनीच्या आहाराबाबत एक रंजक गोष्ट सांगितली आहे.