भारतातील साखर आणि मीठात मायक्रोप्लास्टिकचे कण; नव्या अभ्यासातून धक्कादायक निष्कर्ष समोर
दिल्लीतील टॉक्सिक्स लिंक संस्थेच्या अभ्यासानुसार, भारतातील सर्व साखर आणि मीठाच्या ब्रँडमध्ये मायक्रोप्लास्टिकचे कण आढळले आहेत. आयोडीनयुक्त मीठात सर्वाधिक (प्रति किलो ८९.१५ कण) आणि सेंद्रीय खडे मीठात सर्वात कमी (प्रति किलो ६.७० कण) मायक्रोप्लास्टिक आढळले. साखरेतही प्रति किलो ११.८५ ते ६८.२५ कण मायक्रोप्लास्टिक आढळले.