चष्म्याचा नंबर घालवण्याचा दावा करणाऱ्या आय ड्रॉपवर दोनच दिवसांत बंदी; कारण काय
मुंबईस्थित एंटॉड फार्मास्युटिकल्सने विकसित केलेल्या 'प्रेस्वू आयड्रॉप' या दृष्टीदोष दूर करणाऱ्या औषधाचा परवाना केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेने (CDSCO) निलंबित केला आहे. या आयड्रॉपच्या चुकीच्या प्रचारामुळे आणि असुरक्षित वापराच्या चिंतेमुळे ही कारवाई करण्यात आली. हे औषध डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनवरच उपलब्ध होणार होते, परंतु आता पुढील नोटिशीपर्यंत त्याची विक्री थांबवण्यात आली आहे.