“मी तुरुंगात असताना छान झोपलो”, दररोज फक्त दोन तास झोप घेणाऱ्या सलमान खानने केला खुलासा!
Salman Khan on his sleep routine: बॉलीवूडचा भाईजान सलमान खानने अलीकडेच त्याचा पुतण्या अरहान खानशी झालेल्या संवादात त्याच्या जीवनशैलीबद्दल सांगितले. त्याने सांगितले की, बहुतेक दिवस तो फक्त दोन तास झोपतो. पण, जेव्हा तो तुरुंगात होता, तेव्हा त्याला चांगली झोप लागली होती. “मी साधारणपणे दोन तास झोपतो आणि आणि महिन्यातून एकदा मला एक दिवस ७-८ तास झोप मिळते. कधी कधी सेटवर छोट्या ब्रेकच्या वेळी मी थोड्या वेळासाठी झोपतो,” असे सलमान खान म्हणाला.