Should you eat Bottle guard with peel or without the peel health benefits helps for weight management
1 / 31

वजन नियंत्रणात ठेवेल दुधीची साल! पण ती कशाप्रकारे खावी? तज्ज्ञांनी सांगितले…

हेल्थ January 25, 2025

Bottle Gourd: दुधी भोपळ्याला इंग्रजीत ‘बॉटल गार्ड’ (Bottle Gourd) म्हणतात. दुधी अनेक पारंपरिक पदार्थांमध्ये एक महत्त्वाचा घटक आहे आणि दुधी आरोग्याच्या फायद्यांसाठी प्रसिद्ध आहे. या भाजीत एक मध्यम जाड साल असते, जी आतल्या भागाचे संरक्षण करते. सामान्यतः ती शिजवायच्या आधी काढली जाते. पण, तुम्ही कधी विचार केला आहे का की, दुधीच्या सालीचे सेवन करणे सुरक्षित आहे का? Indianexpress.com ने या प्रश्नावर तज्ज्ञांचा सल्ला घेतला आहे.

Swipe up for next shorts
sensex today nifty50 down
2 / 31

सेन्सेक्सची पडझड थांबेना, गुंतवणूकदारांची प्रतिक्षा संपेना; शेअर बाजारात ‘अच्छे दिन’…

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयांमुळे जागतिक शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. भारतीय बाजारपेठेत निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये सतत घसरण दिसून येत आहे. सोमवारी निफ्टीने नवा विक्रम प्रस्थापित केला तर सेन्सेक्स ५९०.५७ अंकांनी कोसळला. आंतरराष्ट्रीय स्तरावर सुधारणा दिसत असून युक्रेन-रशिया युद्ध संपण्याची चिन्हे आहेत. गुंतवणूकदारांचे लक्ष आता आरबीआयच्या पतधोरण समितीच्या बैठकीकडे आहे.

Swipe up for next shorts
prateik babbar wife priya banerjee breaks silence on not inviting raj babbar family
3 / 31

बब्बर कुटुंबाला लग्नात न बोलावण्याबद्दल प्रतीक बब्बरच्या बायकोने सोडलं मौन, म्हणाली…

अभिनेता प्रतीक बब्बरने व्हॅलेंटाईन डेला (१४ फेब्रुवारी २०२५) प्रिया बॅनर्जीबरोबर दुसरं लग्न केलं. हे लग्न त्याच्या दिवंगत आई स्मिता पाटील यांच्या मुंबईतील घरात झालं. प्रिया बॅनर्जीचे कुटुंबीय आणि स्मिता पाटील यांच्या माहेरची मंडळी उपस्थित होती, मात्र बब्बर कुटुंबाला निमंत्रण नव्हतं. प्रतीकच्या सावत्र भावाने नाराजी व्यक्त केली. प्रिया बॅनर्जीने लग्नात बब्बर कुटुंबाला न बोलावण्याबद्दल स्पष्टीकरण दिलं.

Swipe up for next shorts
Relatives wait outside the airport ahead of the second batch of the immigrants' arrival from the US, in Amritsar, Saturday
4 / 31

लाखो रुपये भरूनही अमेरिकेत डंकीमार्गे पोहोचलेल्या तरुणांची करुण कहाणी!

अमेरिकेत अवैधरित्या राहणाऱ्या भारतीय नागरिकांना अमेरिकेच्या लष्करी विमानाने माघारी पाठवले जात आहे. गोव्यातील दोन तरुणांनी फसवणूक झाल्याचे सांगितले. एजंटने त्यांच्याकडून लाखो रुपये उकळून, मेक्सिकोमार्गे अमेरिकेत पाठवले. तिथे छळ सहन करावा लागला. अमेरिकन सीमा गस्त पथकाने पकडून २० दिवस डिटेंशन सेंटरमध्ये ठेवले. गोवा पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.

New Delhi Railway Station Stampede Update in Marathi
5 / 31

दोन चिमुकल्यांना वाचवलं, पण स्वत:च्या मुलीला गमावलं; दिल्ली चेंगराचेंगरीत…

प्रयागराज एक्स्प्रेससाठी निघालेल्या भाविकांमध्ये नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी होऊन १८ जणांचा मृत्यू झाला. शनिवारी रात्री १५ फेब्रुवारी रोजी ही घटना घडली. ओपल सिंह यांच्या ७ वर्षांच्या मुलीचा यात दुर्दैवी मृत्यू झाला. उद्घोषणांमुळे गोंधळ निर्माण होऊन चेंगराचेंगरी झाली, अशी प्राथमिक माहिती आहे. रेल्वे प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले आहेत.

Netflix Bloodhounds actress Kim Sae Ron
6 / 31

अभिनेत्रीचा २४ व्या वर्षी मृत्यू, घरात आढळला मृतदेह; पोलिसांनी दिली माहिती

दक्षिण कोरियाची अभिनेत्री किम से रॉन, जी 'ब्लडहाउंड्स' सीरिजमधील भूमिकेसाठी ओळखली जात होती, तिचे निधन झाले आहे. ती २४ वर्षांची होती आणि तिचा मृतदेह सियोल येथील घरी सापडला. पोलिसांनी तिच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी तपास सुरू केला आहे. किमने नऊ वर्षांची असताना करिअरची सुरुवात केली होती आणि अनेक चित्रपट व वेब सीरिजमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. तिच्या निधनानंतर चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.

upi payments chargeback system news in marathi
7 / 31

UPI पेमेंट करताय? मग ‘हा’ बदल तुमच्यासाठी महत्त्वाचा; Chargeback मुळे प्रतिक्षेतून सुटका!

बहुतांश मोबाईलधारक यूपीआय पेमेंटचा वापर करतात, ज्यात पेटीएम, फोन पे, जीपे, अॅमेझॉन पे यांसारखे पर्याय आहेत. यूपीआय व्यवस्थेत १५ फेब्रुवारीपासून NPCI ने तांत्रिक बदल केला आहे, ज्यामुळे चार्जबॅक प्रक्रियेत सुधारणा झाली आहे. नव्या TCC प्रणालीमुळे तांत्रिक बिघाड झाल्यास पैसे लवकर परत मिळतील, परिणामी ग्राहकांना त्यांच्या पैशांसाठी जास्त वेळ वाट पाहावी लागणार नाही.

New Delhi Railway Station Stampede Update in Marathi
8 / 31

रेल्वे प्रशासनाने ‘त्या’ संकेताकडे दुर्लक्ष केलं नसतं तर चेंगराचेंगरी टळली असती!

नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर शनिवारी रात्री झालेल्या चेंगराचेंगरीत १८ जणांचा मृत्यू झाला, ज्यात ११ महिला आणि ५ मुलांचा समावेश आहे. या घटनेत अनेक जण जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेच्या दिवशी ६ ते ८ वाजेपर्यंत २६०० अतिरिक्त तिकिटे बुक झाली होती. रेल्वे प्रशासनाने नियोजन केले असते तर ही घटना टाळता आली असती. चौकशी सुरू आहे.

Chhaava Box Office Collection Day 3
9 / 31

Chhaava : ‘छावा’च्या कलेक्शनमध्ये तिसऱ्या दिवशी मोठी वाढ, एकूण कलेक्शन किती? वाचा…

'छावा' चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये खूप उत्सुकता होती आणि १४ फेब्रुवारीला रिलीज झाल्यानंतर त्याला तुफान प्रतिसाद मिळाला. छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्य गाथेवर आधारित या चित्रपटाने पहिल्या दिवशी ३३.१ कोटी, दुसऱ्या दिवशी ३९.३ कोटी, आणि तिसऱ्या दिवशी ४८.५ कोटी रुपये कमावले. तीन दिवसांत भारतात एकूण ११६.५ कोटींची कमाई झाली आहे.

Santosh Juvekar post about Chhaava collection
10 / 31

“मला या आकड्यांपेक्षा…”, संतोष जुवेकरची ‘छावा’च्या कमाईबद्दलची पोस्ट चर्चेत!

संतोष जुवेकरने 'छावा' चित्रपटाच्या दोन दिवसांच्या कमाईचे आकडे शेअर करत एक पोस्ट केली आहे. 'छावा' चित्रपटाने दोन दिवसांत ७२.४ कोटी कमावले आहेत. संतोषने प्रेक्षकांचे आभार मानत, "माझ्या मायबाप प्रेक्षकांचा आकडा बघायला आवडेल," असे कॅप्शन दिले आहे. चाहत्यांनी संतोषच्या पोस्टवर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे. विकी कौशल, रश्मिका मंदाना आणि इतर कलाकारांच्या अभिनयाचेही कौतुक होत आहे.

Fussclass Dabhade OTT Release Update
11 / 31

हेमंत ढोमेचा ‘फसक्लास दाभाडे’ OTT वर प्रदर्शित, पण….; कुठे पाहता येणार सिनेमा? वाचा

हेमंत ढोमे दिग्दर्शित 'फसक्लास दाभाडे' हा चित्रपट जानेवारीत प्रदर्शित झाला होता आणि प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. दाभाडे कुटुंबाची मजेदार गोष्ट आणि त्यांच्या आंबट-गोड नातेसंबंधांनी प्रेक्षकांना भुरळ घातली. आता हा चित्रपट प्राईम व्हिडीओवर ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. क्षिती जोग, सिद्धार्थ चांदेकर, अमेय वाघ यांसारख्या कलाकारांनी यात भूमिका साकारल्या आहेत.

Indian Army NCC recruitment 2025
12 / 31

भारतीय सैन्यात एनसीसी उमेदवारांसाठी मोठी संधी! इतक्या जागांसाठी भरती सुरु, कसा कराल अर्ज

भारतीय सैन्य दलात एनसीसीच्या उमेदवारांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. NCC स्पेशल एन्ट्री स्कीम- ऑक्टोबर २०२५ अंतर्गत ही भरती राबवली जात आहे. यासाठी अर्ज प्रक्रिया भारतीय सैन्याच्या अधिकृत वेबसाइट http://www.joinindianarmy.nic.in वर देखील सुरू झाली आहे. पात्र उमेदवार या भरतीसाठी १५ मार्च २०२५ पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. पण अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि रिक्त जागांसंदर्भातील तपशील जाणून घ्या.

UP man arrested for foot fetish
13 / 31

महिलांच्या पायाचे फोटो जमविण्याचा तरुणाचा छंद, पोलिसांनी अटक करताच समोर आले भयंकर कृत्य

उत्तर प्रदेश पोलिसांनी दीपक शर्मा नावाच्या २५ वर्षीय तरुणाला महिलांच्या पायाचे फोटो काढून ते जमविण्याच्या छंदासाठी अटक केली आहे. हाथरस येथील एका महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपास करून आरोपीला पकडले. दीपक सोशल मीडियावरून महिलांशी मैत्री करून पायांचे फोटो मागायचा, नकार दिल्यास धमकी द्यायचा. त्याच्या फोनमध्ये १००० हून अधिक पायांचे फोटो सापडले.

Fairness Creams Kidney Problems
14 / 31

महिलांनो, फेअरनेस क्रीम वापरताय? मग सावधान, किडनीवर होऊ शकतो गंभीर परिणाम

Fairness Creams Kidney Problems : बरेच जण त्वचेचा रंग उजळवण्यासाठी किंवा त्वचेचा पोत सुधारण्यासाठी फेअरनेस क्रीम्स किंवा इंजेक्शनचा वापर करतात. पण, अशा क्रीम्स आणि इंजेक्शनमुळे तुमच्या शरीरावर हानिकारक परिणाम होत असतात याकडे मात्र लोक दुर्लक्ष करतात. उजळ दिसण्यासाठी वर्षानुवर्षे ते अशा प्रकारच्या क्रीम्स, इंजेक्शनचा वापर करीत राहतात.

urge to pee when you enters in your home know expert advice
15 / 31

घरी येताच तुम्हाला लघवी करण्याची इच्छा होते का? तज्ज्ञांनी सांगितलेला हा सल्ला ठेवा लक्षात

तुम्ही घरात पाऊल ठेवताच अगदी एक मिनिटाच्या आत टॉयलेटमध्ये धावत जाता का? मग या सगळ्यात तुम्ही एकटे नाही आहात, बरं का… याला लॅचकी इन्काँटीनन्स (Latchkey incontinence) असं म्हणतात. लॅचकी इन्काँटीनन्स तेव्हा होते जेव्हा तुमचा मेंदू घरी जाणे आणि लघवी करणे या विचारांना एकत्र जोडतो, ज्यामुळे तुम्हाला अचानक लघवी करण्याची इच्छा होते. तज्ज्ञांचा असा सल्ला आहे की हा एक ‘कंडिशन्ड रिस्पॉन्स’ आहे. कारण- मानसिक घटकांमुळे तुमचे मूत्राशय नेहमी आरामाची अपेक्षा करते.

Prateik Babbar has hurt his late mother Smita Patil by not inviting father Raj Babbar to his wedding
16 / 31

“प्रतीक बब्बरने लग्नात वडिलांना न बोलवून दिवंगत आई स्मिता पाटील यांना दुखावलं”

बॉलीवूड अभिनेता प्रतीक बब्बरने व्हॅलेंटाईन डेला त्याची गर्लफ्रेंड प्रिया बॅनर्जीशी लग्न केलं. हे लग्न त्याने दिवंगत आई स्मिता पाटील यांच्या घरी खासगी समारंभात केलं. मात्र, त्याने वडील राज बब्बर आणि सावत्र भावंडं आर्या व जुही यांना आमंत्रण दिलं नाही. आर्यने याबद्दल नाराजी व्यक्त केली आणि वडील राज बब्बर दुखावले असल्याचं सांगितलं. प्रतीकच्या या निर्णयामुळे कुटुंबात नाराजी आहे.

marathi actress kunal dhumal engagement
17 / 31

लोकप्रिय मराठी अभिनेत्याने केला साखरपुडा, होणारी पत्नी आहे डेंटिस्ट; फोटो पाहिलेत का?

मराठी अभिनयविश्वात सध्या लगीनघाई सुरू आहे. 'लक्ष्मी निवास' फेम दिव्या पुगावकर आणि बिग बॉस मराठी फेम अंकिता प्रभू वालावलकर यांचे आज लग्न आहे. अभिनेता कुणाल धुमाळने साखरपुड्याची बातमी शेअर केली आहे. त्याची होणारी पत्नी डॉ. सोनाली काजबे डेंटल सर्जन आहे. कुणाल व सोनालीने पारंपरिक पद्धतीने साखरपुडा केला. अनेक सेलिब्रिटींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

second batch Indian deportees
18 / 31

दुसऱ्या फेरीतही अवैध स्थलांतरितांना लष्करी विमानातून बेड्या घालून आणले; प्रवाशांचा आरोप

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिकेच्या दौऱ्यानंतर ११९ अवैध भारतीय स्थलांतरितांना अमृतसरमध्ये परत पाठवण्यात आले. ५ फेब्रुवारीला पहिले विमान आले होते, तर १५ फेब्रुवारीला दुसरे विमान आले. या स्थलांतरितांमध्ये पंजाब, हरियाणा, गुजरात, उत्तर प्रदेश, गोवा, महाराष्ट्र, राजस्थान, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमधील लोकांचा समावेश आहे.

ileana dcruz second pregnancy post
19 / 31

बॉलीवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा आई होणार, दीड वर्षांचा आहे मोठा मुलगा

बॉलीवूड अभिनेत्री इलियाना डिक्रुझ पुन्हा गरोदर असल्याच्या चर्चेत आहे. तिने सोशल मीडियावर मिडनाइट स्नॅक्सचा फोटो शेअर करत 'तुम्ही प्रेग्नंट आहेस हे न सांगता सांगा' असे कॅप्शन दिले आहे. यापूर्वीही तिने दुसऱ्या प्रेग्नेंसीचे संकेत दिले होते. इलियाना आणि तिचा पती मायकल डोलन यांना ऑगस्ट २०२३ मध्ये पहिलं बाळ झालं होतं. इलियाना अखेरची 'दो और दो प्यार' चित्रपटात दिसली होती.

Maruti suzuki brezza increased price due to adding 6 airbags know price and safety features
20 / 31

मारुतीचा दणका! सर्वाधिक विक्री होणाऱ्या या कारची वाढवली किंमत, पण त्याचा ग्राहकांनाच फायदा

ऑटो 23 hr ago

Maruti Suzuki Brezza: देशातील सर्वात मोठी कार विकणारी कंपनी मारुती सुझुकीने त्यांच्या ब्रेझाच्या किमतीत वाढ केली आहे. तथापि, या वाढीव किमतीचा फायदा फक्त ग्राहकांनाच होईल असे कंपनीचे म्हणणे आहे. खरंतर, मारुतीने त्यांच्या ब्रेझामध्ये अनेक नवीन सेफ्टी फीचर्स समाविष्ट केले आहेत, ज्यामुळे या कारची किंमत वाढली आहे. कंपनी या कारमध्ये ६ एअरबॅग्ज अ‍ॅड करत आहे.

Devendra Fadnavis on Love Jihad Law
21 / 31

“मुलं जन्माला घालून”, ‘लव्ह जिहाद’बाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

महाराष्ट्र सरकारने लव्ह जिहादविरोधात कारवाईसाठी पोलीस महासंचालकांच्या नेतृत्वाखाली सात सदस्यांची समिती स्थापन केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लव्ह जिहादविरोधात कडक कार्यवाही करण्याचा मानस व्यक्त केला. फडणवीस म्हणाले की, खोटे बोलून, फसवणूक करून लग्न करणे आणि धर्मांतर करणे अयोग्य आहे.

Sanjay Raut on Delhi Stampede
22 / 31

‘दिल्लीच्या चेंगराचेंगरीच्या घटनेत १२० प्रवाशी दगावले’, संजय राऊत धक्कादायक दावा

नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर महाकुंभमेळ्यात जाण्यासाठी झालेल्या गर्दीमुळे चेंगराचेंगरीत १८ प्रवाशांचा मृत्यू झाला. शिवसेनेचे संजय राऊत यांनी भाजपावर महाकुंभचा प्रचारासाठी वापर केल्याचा आरोप केला. राऊत यांनी मृतांचा आकडा १२० ते १५० असल्याचा दावा केला. त्यांनी सरकारवर आकडे लपवण्याचा आरोप करत, कुंभमेळ्यात सात हजार लोक बेपत्ता झाल्याचे सांगितले.

casualties in New Delhi stampede
23 / 31

‘रेल्वेची ती एक सूचना आणि चेंगराचेंगरी झाली’, हमालाने सांगितला धक्कादायक प्रसंग

दिल्ली रेल्वे स्थानकावर महाकुंभमेळ्यात जाणाऱ्या भाविकांच्या गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाली. १५ फेब्रुवारी रोजी रात्री प्रयागराजला जाणाऱ्या रेल्वेने ऐनवेळी फलाट बदलल्याने प्रवाशांनी त्याठिकाणी धाव घेतली, ज्यामुळे १८ जणांचा मृत्यू झाला आणि १० हून अधिक जखमी झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर नेत्यांनी याबद्दल शोक व्यक्त केला.

New delhi stampade
24 / 31

दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी १५ जणांचा मृत्यू, अनेक प्रवाशी जखमी

देश-विदेश February 16, 2025

दिल्ली रेल्वे स्थानकावर काल (१५ फेब्रुवारी) रात्री चेंगराचेंगरी होऊन १५ जणांचा मृत्यू झाला, तर अनेक प्रवाशी जखमी झाले. उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमेळ्याला जाण्यासाठी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरून दोन विशेष गाड्या चालवल्या जात होत्या. या गाड्यांमध्ये चढण्यासाठी मोठ्या संख्येने प्रवासी आल्याने प्लॅटफॉर्म क्रमांक १४ आणि १५ वर ही घटना घडली. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.

prateik babbar Cried in wedding emotional video viral
25 / 31

Video: स्मिता पाटीलचा मुलगा स्वतःच्याच लग्नात रडला; प्रतीकचा व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले…

बॉलीवूड February 16, 2025

बॉलीवूड अभिनेता प्रतीक बब्बरने त्याची गर्लफ्रेंड प्रिया बॅनर्जीशी दुसरं लग्न केलं. मुंबईत १४ फेब्रुवारी २०२५ रोजी झालेल्या या लग्नात प्रतीकच्या कुटुंबातील कोणीही उपस्थित नव्हतं. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत प्रतीक हमसून रडताना दिसतो. त्याच्या पहिल्या पत्नी सान्या सागरसोबत २०१९ मध्ये लग्न झालं होतं, पण २०२३ मध्ये घटस्फोट झाला. प्रतीकच्या 'धूम धाम' चित्रपटाचा प्रीमियरही त्याच दिवशी झाला.

Sanya Sagar post after ex husband prateik babbar got married
26 / 31

प्रतीक बब्बरच्या दुसऱ्या लग्नानंतर पहिल्या बायकोची पोस्ट; म्हणाली, “त्याची सवय…”

बॉलीवूड February 16, 2025

बॉलीवूड अभिनेता प्रतीक बब्बरने १४ फेब्रुवारीला गर्लफ्रेंड प्रिया बॅनर्जीशी मुंबईत लग्न केलं. त्याच्या पहिल्या बायको सान्या सागरने इन्स्टाग्रामवर एकटेपणाबद्दल पोस्ट केली आहे. प्रतीक व सान्या २०१९ मध्ये लग्न करून २०२३ मध्ये विभक्त झाले. सान्या सागर सध्या गोव्यात स्थायिक आहे आणि 'पार्टी टिल आय डाय' सीरिजमध्ये झळकली आहे. ती सोशल मीडियावर सक्रिय आहे.

who is prateik babbar ex wife Sanya Sagar
27 / 31

प्रतीक बब्बरची पहिली पत्नी कोण? ४ वर्षांत मोडला संसार; घटस्फोटानंतर आता मुंबई सोडून…

प्रतीक बब्बरने व्हॅलेंटाईन डेला प्रिया बॅनर्जीशी दुसरं लग्न केलं. त्याचं पहिलं लग्न सान्या सागरशी झालं होतं, पण २०२३ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. सान्या सागर लखनऊची असून तिने फॅशन कम्युनिकेशन आणि फिल्ममेकिंगमध्ये शिक्षण घेतलं आहे. ती सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करते आणि स्वतःचं प्रोडक्शन हाऊस आहे. घटस्फोटानंतर ती गोव्यात स्थायिक झाली आहे.

Tata curvv record by pulling aircraft boeing 737 of 48000 kg weight see video
28 / 31

टाटाने केली सगळ्यांची बोलती बंद! टाटाच्या एसयूव्हीने ४८ हजार किलोचं विमान ओढून रचला विक्रम

ऑटो February 15, 2025

Tata curvv sets record: टाटा मोटर्सच्या गाड्या किती शक्तिशाली आहेत हे संपूर्ण जगाला माहिती आहे, पण टाटा कर्व्ह एसयूव्हीने असा पराक्रम केला आहे की त्याबद्दल जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. १५३० किलो वजनाच्या टाटा कर्व्ह एसयूव्ही कर्व्हने ४८,००० किलो वजनाचे बोईंग ७३७ विमान ओढून सर्व विक्रम मोडून आपली ताकद दाखवली आहे. टाटा कर्व्हने एसयूव्ही सेगमेंटमध्ये एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे आणि एक नवीन बेंचमार्क स्थापित केला आहे.

sharad ponkshe review chhaava vicky kaushal laxman utekar
29 / 31

Video: ‘छावा’ चित्रपट पाहिल्यावर शरद पोंक्षेंची प्रतिक्रिया, म्हणाले…

बॉलीवूड February 16, 2025

अभिनेते शरद पोंक्षे यांनी 'छावा' चित्रपटाबद्दल एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका केली असून रश्मिका महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत आहे. पोंक्षे यांनी चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचे कौतुक केले आहे आणि प्रत्येक भारतीयाने हा चित्रपट पाहावा असे आवाहन केले आहे. त्यांनी चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाचे आणि एआर रहमान यांच्या बॅकग्राउंड म्युझिकचेही कौतुक केले आहे.

Salman khan on sleep schedule said he slept well in jail and now sleep 2 hours daily expert advice on bad sleep routine
30 / 31

“मी तुरुंगात असताना छान झोपलो”, दररोज फक्त दोन तास झोप घेणाऱ्या सलमान खानने केला खुलासा!

हेल्थ February 15, 2025

Salman Khan on his sleep routine: बॉलीवूडचा भाईजान सलमान खानने अलीकडेच त्याचा पुतण्या अरहान खानशी झालेल्या संवादात त्याच्या जीवनशैलीबद्दल सांगितले. त्याने सांगितले की, बहुतेक दिवस तो फक्त दोन तास झोपतो. पण, जेव्हा तो तुरुंगात होता, तेव्हा त्याला चांगली झोप लागली होती. “मी साधारणपणे दोन तास झोपतो आणि आणि महिन्यातून एकदा मला एक दिवस ७-८ तास झोप मिळते. कधी कधी सेटवर छोट्या ब्रेकच्या वेळी मी थोड्या वेळासाठी झोपतो,” असे सलमान खान म्हणाला.

Panipuri Offers Nagpur
31 / 31

‘या’ पाणीपुरीवाल्याला सॅल्युट; ९९ हजारांत जन्मभर अनलिमिडेट पाणीपुरी मिळणार

नागपूरमधील विजय मेवालाल गुप्ता यांनी पाणीपुरीसाठी अनोख्या ऑफर्स दिल्या आहेत. ९९ हजार रुपयांत आजन्म अनलिमिटेड पाणीपुरीची ऑफर आहे. १५१ पाणीपुरी खाणाऱ्याला २१ हजारांचं बक्षीस मिळेल. महाकुंभ ऑफरमध्ये ४० पाणीपुरी फक्त १ रुपयात, तर लाडकी बहीण योजनेत महिलांना ६० रुपयांत अनलिमिटेड पाणीपुरी मिळेल. आठवड्याची आणि मासिक ऑफरही उपलब्ध आहेत.