तुम्ही रोज रात्री पोटावर झोपताय? एक महिना असं केल्याने होऊ शकतो गंभीर त्रास…
Sleeping on Stomach: पोटावर झोपल्यामुळे छाती आणि पोटावर दाब येतो, त्यामुळे श्वासोच्छवास नीट व खोल होत नाही. प्रत्येक माणसाची झोपण्याची एक आवडती पद्धत असते, ज्यामुळे त्याला लगेच झोप लागते. काही जण अंग गोल करून झोपतात, तर काही जण कुशीवर सरळ झोपणे पसंत करतात. त्यापैकीच एक लोकप्रिय पद्धत म्हणजे पोटावर झोपणे. पण ही पद्धत खरंच योग्य आहे का? या सवयीचे शरीरावर चांगले तसेच वाईट असे दोन्ही परिणाम होऊ शकतात.