घरी येताच तुम्हाला लघवी करण्याची इच्छा होते का? तज्ज्ञांनी सांगितलेला हा सल्ला ठेवा लक्षात
तुम्ही घरात पाऊल ठेवताच अगदी एक मिनिटाच्या आत टॉयलेटमध्ये धावत जाता का? मग या सगळ्यात तुम्ही एकटे नाही आहात, बरं का… याला लॅचकी इन्काँटीनन्स (Latchkey incontinence) असं म्हणतात. लॅचकी इन्काँटीनन्स तेव्हा होते जेव्हा तुमचा मेंदू घरी जाणे आणि लघवी करणे या विचारांना एकत्र जोडतो, ज्यामुळे तुम्हाला अचानक लघवी करण्याची इच्छा होते. तज्ज्ञांचा असा सल्ला आहे की हा एक ‘कंडिशन्ड रिस्पॉन्स’ आहे. कारण- मानसिक घटकांमुळे तुमचे मूत्राशय नेहमी आरामाची अपेक्षा करते.