केवळ एका विद्यार्थिनीसाठी कोल्हापूरच्या शिक्षकाची जंगलातून रोज ५ किमींची पदयात्रा
कोल्हापूरच्या गगनबावडा तालुक्यातील कावळटेक धनगरवाडा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत ५५ वर्षीय शिक्षक जीवन मिथारी एकमेव विद्यार्थिनीला शिकवण्यासाठी रोज ५ किमी घनदाट जंगलातून पायपीट करतात. २०१३ पासून ते येथे कार्यरत आहेत. शाळेत वीज, पाणी, वाहने यांची सोय नाही. विद्यार्थ्यांची संख्या कमी झाल्याने शाळेत फक्त एकच विद्यार्थिनी आहे. मिथारी यांचे समर्पण आणि धाडस उल्लेखनीय आहे.