कोल्हापुरात निवडणुकांचा मोसम; गोकुळ, जिल्हा बँक, पदवीधर, शिक्षकमुळे मतदारांची चलती
कोल्हापूर : शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत राज्यभर महायुती आणि महाविकास आघाडीची प्रतिष्ठा पणाला लागली असली, तरी कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय चित्र मात्र पूर्णपणे वेगळे आहे. येथील सहकार सम्राटांना या दोन्ही निवडणुकांपेक्षा गोकुळ दूध संघाची निवडणूक हीच खरी प्रतिष्ठेची लढाई बनली आहे. त्यामुळे शिक्षक आणि पदवीधर निवडणूक बाजूला पडून संपूर्ण राजकीय यंत्रणा गोकुळभोवती फिरताना दिसत आहे.