शहरात पूर आणि धरणात कमी पाणी, असे का होते?; या विरोधाभासामागचे विज्ञान नेमके काय?
मुंबई-पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय झाले असून पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, ६ जुलै २०२६ पर्यंत राज्यातील धरणांमधील पाणीसाठा ७ टक्क्यांवरून केवळ १७ टक्क्यांवर पोहोचला आहे. शहरात पूर आणि धरणात पाणीटंचाई अशा विरोधाभासामागे नेमके काय कारण आहे?