‘होळी खेळणे गुन्हा’, रमजानच्या टीकेनंतर मौलानाकडून आता मोहम्मद शमीची मुलगी लक्ष्य
भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद शमीवर रमजानच्या महिन्यात उपवास न केल्याबद्दल मौलाना शाहबुद्दीन रझवी यांनी टीका केली होती. आता त्यांनी शमीच्या मुलीवर होळी खेळल्याबद्दल टीका केली आहे. रझवी म्हणाले की, मुलगी अजाणतेपणी होळी खेळली असेल तर गुन्हा नाही, पण जाणूनबुजून खेळली असेल तर शरीयत नुसार गुन्हा आहे. त्यांनी शमीला इस्लामच्या तत्त्वांचे पालन करण्याचा सल्ला दिला आहे.