मैदानात न उतरताही ‘मॅच विनर’; क्रीडा क्षेत्रावर अजित पवारांची ‘पॉवरफुल’ पकड!
महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवार हे नाव सहकार, प्रशासन आणि थेट निर्णयशैलीसाठी ओळखले जाते. मात्र, त्यांनी क्रीडा क्षेत्राशीही आपले नाते जपले होते. खेळाडू नसतानाही त्यांनी क्रीडा संकुले, स्पर्धा आणि व्यवस्थापनात महत्त्वाची भूमिका बजावली. क्रिकेट, कबड्डी, कुस्ती यांसारख्या खेळांना त्यांनी प्रोत्साहन दिले. "खेळाडूला पक्ष नसतो, त्याला संधी हवी असते," या भूमिकेतून त्यांनी खेळाडूंना मदत केली.