अमन सेहरावतने ऑलिम्पिक पदक जिंकत घडवला इतिहास, भारतासाठी ही कामगिरी करणारा पहिला खेळाडू
पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताच्या २१ वर्षीय कुस्तीपटू अमन सेहरावतने ५७ किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली. पोर्तो रिकोच्या डेरियन तोई क्रूझचा १३-५ असा पराभव करत अमनने भारताचे सहावे पदक मिळवले. अमन हा ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारा सर्वात तरुण भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याने आपल्या आक्रमक खेळाने पदक जिंकत कुस्तीमध्ये भारताची परंपरा कायम ठेवली.