Video: “मी आणि विराट…”, अनुष्का शर्माचे पालकत्वावर मोठे वक्तव्य
अनुष्का शर्मा आणि विराट कोहली लंडनमध्ये राहत आहेत. अनुष्का एका कार्यक्रमात पालकत्वावर बोलली आहे. तिने परफेक्ट पालक होण्याच्या दडपणावर चर्चा केली आणि आपल्या चुका मुलांसमोर मान्य करण्याचे महत्त्व सांगितले. अनुष्काने सांगितले की, ती आणि विराट मुलांना कृतीतून शिकवतात. तिच्या मुलीच्या जेवणाच्या वेळा आणि तिच्या जीवनातील बदलांवरही तिने विचार मांडले.