सचिन तेंडुलकरच्या लेकाने मैदान गाजवलं, ९ विकेट्स घेत अर्जुनने संघाला मिळवून दिला विजय
अर्जुन तेंडुलकरने कर्नाटकात सुरू असलेल्या के थिमप्पिया मेमोरियल स्पर्धेत गोव्याकडून खेळताना केएससीए इलेव्हनविरुद्ध भेदक गोलंदाजी केली. पहिल्या डावात ५ आणि दुसऱ्या डावात ४ विकेट घेत अर्जुनने एकूण ९ विकेट्स मिळवल्या. गोव्याने पहिल्या डावात ४१३ धावा करत १८९ धावांनी विजय मिळवला. अर्जुनने त्याच्या कामगिरीचा व्हिडीओ इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे.