भारताच्या वेळापत्रकात केला मोठा बदल, बांगलादेश आणि इंग्लंडविरुद्धची मालिका कधी होणार? पाहा
बीसीसीआयने २०२४-२५ देशांतर्गत हंगामासाठी अद्ययावत वेळापत्रक जाहीर केले आहे. भारत-बांगलादेश टी-२० मालिका ६ ऑक्टोबरपासून ग्वाल्हेरमध्ये सुरू होईल. धर्मशाला स्टेडियमच्या ड्रेसिंग रूममध्ये सुधारणा होत असल्याने हा बदल करण्यात आला आहे. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या आणि दुसऱ्या टी-२० सामन्यांचे स्थळ बदलले असून, पहिला सामना कोलकात्यात आणि दुसरा चेन्नईत होईल.