अथिया शेट्टीने मुलीचा पहिला फोटो शेअर करून जाहीर केलं नाव, अर्थ सांगत म्हणाली…
अभिनेत्री अथिया शेट्टी आणि क्रिकेटर केएल राहुल नुकतेच आई-बाबा झाले आहेत. अथियाने २४ मार्च रोजी एका गोंडस मुलीला जन्म दिला. त्यांनी आपल्या मुलीचं नाव 'इवारा' ठेवलं आहे, ज्याचा अर्थ 'देवाची देणगी' असा आहे. केएल राहुलने आयपीएलचा सामना सोडून मुंबईत येऊन आपल्या लेकीला भेट दिली. त्यांनी इन्स्टाग्रामवर एक सुंदर फॅमिली फोटो पोस्ट केला आहे.